पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नीच माणूस' या पंतप्रधान मोदींवरील टीकेवर मणिशंकर अय्यर ठाम

मणिशंकर अय्यर

लोकसभा निवडणूक संपण्याच्या अगदी काही दिवस आधी काँग्रेसचे वादग्रस्त नेते मणिशंकर अय्यर यांनी आणखी आपल्या जुन्याच वक्तव्याचा पुनरुच्चार करुन खळबळ उडवून दिली आहे. अय्यर यांनी २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'नीच प्रवृत्तीचा माणूस' म्हटले होते. यावेळी त्यांनी यावर एक लेख लिहून आपले वक्तव्य बरोबर होते, असे म्हटले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेस नेत्यांना यावर माफी मागावी लागली होती. काँग्रेसने या प्रकरणी हातही झटकले होते. 

लोकसभेचे निकाल काहीही येवोत, विधानसभेची तयारी सुरू करा; राज ठाकरेंचे आदेश


२०१७ मध्ये माध्यमांशी बोलताना अय्यर यांनी मोदींना 'नीच प्रवृत्तीचा माणूस' म्हटले होते. त्यावेळी भाजपसमवेत अनेक पक्षांनी टीका केली होती आणि अय्यर यांना याप्रकरणी माफीही मागावी लागली होती. पण नुकताच लिहिलेल्या एका लेखात त्यांनी मोदींच्या प्रचारसभांचा हवाला देत म्हटले आहे की, लक्षात आहे का, २०१७ मध्ये मोदींना मी काय म्हटले होते ? मी खरी भविष्यवाणी केली नव्हती का ?. 'एएनआय'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. दुसरीकडे काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तव्याप्रकरणी हात वर करत चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर पक्षाध्यक्ष राहुल गांधी कारवाई करतात, असे म्हटले आहे. पक्षाचे नेते पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी यांनी संवादाचा स्तर खाली आणल्याची टीका केली आहे. 

जय श्रीराम म्हणतोय, मला अटक करुन दाखवा; अमित शहांचे ममतांना आव्हान

मणिशंकर यांचे २०१७ मधील वक्तव्य 

दरम्यान, अय्यर यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटल्यानंतर भाजपही आक्रमक झाली आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टि्वट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या प्रेमाच्या राजकारणात गांधी कुटुंबीयांच्या आणखी एका 'मणि'ने मोदींवर केलेल्या 'नीच' वक्तव्याला योग्य ठरवत आणखी योगदान दिले आहे, असा टोला लगावला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 congress leader mani shankar aiyar is firm for comment on pm modi neech aadmi