पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल पण मोदी नकोः काँग्रेस

गुलामनबी आझाद (ANI)

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा अजून बाकी आहे. तत्पूर्वीच काँग्रेसने बहुमत न मिळाल्यास आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. इतकेच नव्हे तर आघाडीत पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा एनडीएला सरकार बनवण्यापासून रोखणे हाच काँग्रेसचा एकमेव उद्देश असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी स्पष्ट केले आहे. 

निवडणूक आयोग दबावाखाली, ममतांच्या समर्थानंतर मायावती यांचा आरोप

आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे. जर काँग्रेसच्या बाजूने निकाल आल्यास आम्ही नेतृत्व करु. एनडीएचे सरकार सत्तेत पुन्हा येवू नये हेच आमचे लक्ष्य आहे. सर्वसंमतीने घेण्यात आलेल्या निर्णयाबरोबर आम्ही जाऊ, असे आझाद म्हणाले. काँग्रेसला या निवडणुकीत जास्त अपेक्षा नसल्याचे आझाद यांच्या वक्तव्यानुसार वाटते. भाजपला रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मोठा त्याग करण्याची काँग्रेसने तयारी केली आहे.

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकणार नाही : संजय राऊत

आझाद म्हणाले, जोपर्यंत आम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही याबाबत काही म्हणणार नाही आणि कोणीही ही जबाबदारी घेत असेल तर त्याला आडकाठीही आणणार नाही. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे म्हटले होते. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर येऊ शकते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Congress Has No Problem If It Doesnt Get PM s Post says Ghulam Nabi Azad