पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता सक्रिय राजकारणात आले नसते तर भेकडपणा ठरला असता - प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

लोकशाही, घटनात्मक संस्था आणि राज्यघटना यांच्यावर हल्ला केला जाऊ लागला असताना, सक्रिय राजकारण न येणे हा भेकडपणा ठरला असता, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मांडली. 'हिंदूस्थान'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखडपणे आपली मते मांडली. प्रियांका गांधी या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सक्रिय राजकारणात आल्या आहेत. पक्षाने त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली असून, त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आले आहे.

टीव्हीवर झळकणे ही राजकीय ताकद नसते, प्रियांका गांधींचा मोदींना टोला

काँग्रेस पक्षाने आपल्याला उत्तर प्रदेशची जबाबदारी दिल्यामुळे मी सध्या केवळ त्याच राज्यावर लक्ष केंद्रित केले होते. पण यापुढे अन्य राज्यांची जबाबादारी पक्षाने दिली तर मी तिथे सुद्धा जाईन. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य आहे. त्यामुळे तिथे लक्ष घालण्यासाठी काँग्रेसने मला सांगितले. विशेषतः पूर्व उत्तर प्रदेशमध्ये मी जास्त काम केले. तिथे अनेक नेत्यांनी माझ्या सभांसाठी, रोड शोसाठी आग्रह केला, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला जेव्हा मला काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी मी ते स्वीकारण्यास नकार दिला होता. मला असे वाटते की माझा तो निर्णय चुकीचा होता. पण कोणताही माणूस आयुष्यात चुकांमधूनच तर शिकतो. त्यामुळे मलाही यातून शिकायला मिळाले. जेव्हा निवडणुकीच्या आधी माझ्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला. त्यावेळी मी तो लगेचच स्वीकारला, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या निकालांबद्दल अंदाज व्यक्त करताना त्या म्हणाल्या, खूप जागांवर आम्ही पूर्ण ताकदीने लढतो आहोत. आमचे उमेदवार चांगले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साहही जोरदार आहे. अजून उत्तर प्रदेशात काँग्रेसचे पक्ष संघटन व्यवस्थित आहे. काही ठिकाणी अडचणी आहेत. पण त्यावर हळूहळू मात केली जाईल. सगळ्यांनी मिळून काम करायचे ठरले आहे. त्यामुळे आम्ही चांगली टक्कर देणार आहोत.

भाजपने केलेल्या आरोपावर सॅम पित्रोदांचे प्रत्युत्तर

सध्या केवळ उत्तर प्रदेशात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आले आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीत मला मुख्यमंत्री किंवा अन्य कोणत्याही पद मिळावे असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 congress general secretary priyanka gandhi exclusive interview with hindustan