पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हुआ तो हुआ' हाच काँग्रेस-महाआघाडीचा मंत्र: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांनी 'हुआ तो हुआ' या तीन शब्दांच्या आधारावरच देश चालवला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. देशातील शेतकरी रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे पाण्यासाठी हैराण झाला. त्यावेळी ही मंडळी झाले ते झाले (हुआ तो हुआ) असे म्हणत राहिले. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने नेहमी कौटुंबिक विकासाबद्दल विचार केला. राष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांनी कधीच विचार केलेला नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शनिवारी गाझीपूर येथील प्रचार सभेत मोदी बोलत होते. 

निकालानंतर काँग्रेसपुढे सर्व पर्याय खुले, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न

गेल्या पाच वर्षांच्या काळात भ्रष्टाचार, दहशतवाद आणि नक्षलवाद सारख्या बाबी नष्ट करण्यावर सरकारने भर दिला. जनतेन दिलेल प्रेम आणि समर्थन यामुळे राष्ट्रहिताचे निर्यण घेणे शक्य झाले, असेही मोदी यावेळी म्हणाले. आज गाझीपूर विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे.  काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या घटक पक्षातील लोकांचे सत्य तुमच्या समोर आल्यानंतर २०१४ मध्ये जनतेने प्रधान सेवक म्हणून देशसेवा करण्याचा सन्मान दिला. भेदभाव न करता विकास शक्य आहे. सर्वांना सोबत घेऊन विकास करणे शक्य आहे. हे आमच्या सरकारने दाखवून दिले. आता प्रत्येक गावात टपाल सेवा आणि बँक सेवा सुरु झाली आहे. सरकारी योजनेतील पैसा लहानात-लहान शेतकऱ्याच्या थेट बँकेत जमा होतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.

मोदी ओबीसी असते तर RSS ने त्यांना पंतप्रधान केले नसते: मायावती

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी जातीवाचक हल्ला करत आहेत मी मागास समाजातच जन्माला आलो. परंतु देशातील प्रत्येक मागास वर्गासाठी आणि गरीबासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगत त्यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यावर निशाणा साधला. मोदी हे राजकीय स्वार्थासाठी जबरदस्तीने मागास जातीचे बनले आहेत, अशी टीका मायावतींनी केली होती.  

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 congress and his alliance mantra is hua so hua says pm narendra modi in ghazipur up