पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दुर्गा पुजा नव्हे तर मोहरमची वेळ बदलण्यास सांगितले'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार सभेदरम्यान भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले आहे. त्यात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर आणखी एक शाब्दिक तोफ डागली आहे. पश्चिम बंगालमधील बारासात येथील प्रचार सभेत योगी आदित्यनाथ यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर अल्पसंख्याकाच्या मुद्यावरुन राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.  

ते म्हणाले की, संपूर्ण देशात दुर्गा पूजा आणि मोहरम एकाच दिवशी होते. यावेळी मला उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी पुजेची वेळ बदलण्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी मी पुजेची वेळ न बदलण्याचा निर्णय घेतला. जर बदल करायचा असेल तर मोहरमच्या वेळेत बदल करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले.  

 ममता बॅनर्जींची वर्तणूक सद्दाम हुसेनसारखीः विवेक ओबेरॉय

उत्तर प्रदेशासह संपूर्ण देशात दुर्गा पूजा आणि मोहरम एकत्र साजरा करण्यात आला. यूपीमध्ये कोणतीही हिंसक घटना घडली नाही. कारण मी लोकांना यासंदर्भात कल्पना दिली होती. पश्चिम बंगालमध्ये असे का झाले नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आज (बुधवार) ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकशाहीला जूमानत नाही, असा आरोप करत  त्यांनी २३ मे रोजीच्या निकालानंतर देशात आणि पश्चिम बंगालमध्येही भाजप सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही व्यक्त केला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Change time of Muharram not Durga Puja Yogi Adityanath Statement in west bengal rally