पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगालमध्ये तणावःअमित शहांच्या रोड शो पूर्वी भाजपचे पोस्टर्स हटवले

भाजपच्या रोड शो पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पोस्टर्स काढण्यात आले (ANI)

सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरु झाला आहे. भाजपच्या रोड शो पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पोस्टर हटवण्यात येत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष सुरु झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप केला आहे. सरकारी यंत्रणेचा भाजपविरोधात दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. 

लोकसभेच्या निकालांनंतर ममता बॅनर्जींचे करायचे काय?, डाव्यांपुढील मोठी अडचण

बंगालमध्ये आतापर्यंत सहा टप्प्यात मतदान झाले आहे आणि प्रत्येक टप्प्यात हिंसाचार झाला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोचे आज आयोजन करण्यात आले आहे. पण रोड शो पूर्वीच भाजपचे पोस्टर काढण्यात आले. त्यानंतर कोलकातामध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले. 

जय श्रीराम म्हणतोय, मला अटक करुन दाखवा; अमित शहांचे ममतांना आव्हान

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केल्यामुळे अटकेत असलेल्या भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. न्यायालयाने सुरुवातीला प्रियांका यांना ममता बॅनर्जी यांची लेखी माफी मागण्याची अट ठेवली होती. मात्र, न्यायालयाने नंतर शर्मा यांचे वकील कौल यांना पुन्हा बोलावले आणि आपल्या आदेशात बदल करत लेखी माफी मागण्याची अट रद्द केली आणि शर्मा यांना त्वरीत मुक्त करण्याचे निर्देश दिले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 bjp roadshow in kolkata posters of pm modi and amit shah have been removed