पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जनता मोदींसोबत, पुन्हा एकदा आमचेच सरकार'

अमित शहा

देशातील जनता आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला गेल्यावेळेसपेक्षा जास्त मते मिळतील आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. 'हिंदूस्थान'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर खुलेपणाने आपली मते मांडली.

अमित शहा म्हणाले, यंदाच्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लाट आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे लोक मोदींच्या पाठिशी उभे राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेली कामे पुढे घेऊन जाण्यासाठी लोक त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा मी केला आहे. प्रत्येक भागातील लोक मोदींच्या पाठिशी उभे आहेत. लोकांचे मोंदींबद्दलचे प्रेम मी स्वतः अनुभवले आहे.

भाजपची नव्हे तर एनडीएची सत्ता येईल, संजय राऊत यांचा दावा

पाच वर्षे आमच्याकडे सत्ता असल्यामुळे आमच्याबद्दल काही लोकांमध्ये नाराजी असू शकते. पण नाराजीपेक्षा समाधानी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच निवडणुकीत आम्हाला फायदा होईल, असे सांगून अमित शहा म्हणाले, महाआघाडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. जास्त राज्यांमध्ये तिरंगी लढती पाहायला मिळताहेत. काही राज्यांमध्ये तर चतुरंगी लढाई सुद्धा आहेत. अजून विरोधकांनी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवारही जाहीर केलेला नाही. विरोधक गोंधळलेले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

देशात दोन पंतप्रधान कधीच होऊ देणार नाही, अमित शहा

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले, तेथील जनता आता जातीयवाद, संतुष्टीकरण आणि एकाच कुटुंबाचे लांगूलचालन यापासून पुढे गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोदींची लोकप्रियता प्रचंड आहे. त्याचबरोबर आमच्या पक्षाचे संघटनही तिथे मजबूत आहे. त्यामुळे तिथे आम्ही सपा-बसपा आघाडीला चांगली टक्कर देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 bjp president amit shah says number of people happy with government work