पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोड शो दरम्यानच्या हिंसाचारात TMC च्या गुंडांचा हात : अमित शहा

भाजप अध्यक्ष अमित शहा

पश्चिम बंगालमध्ये रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचा हात असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात अमित शहांच्या पश्चिम बंगालमधील रोड शोमदरम्यान कोलकाता विद्यापीठातील विद्यार्थी आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. रोड शो दरम्यान जाळपोळही करण्यात आली. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.

बंगाल:अमित शहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार, पोलिसांचा लाठीचार्ज

या घटनेनंतर एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. टीएमसीचे (तृणमूल काँग्रेस) गुंड भाजपाला रोखू शकत नाहीत. भाजपला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवला, असा आरोप करत त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: loksabha-election 2019 BJP President Amit Shah blames Mamata Banerjees party doing Violence in roadshow north kolkata west bengal