पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVMला विरोध करणाऱ्या पक्षांना अमित शहांचे ६ प्रश्नं

अमित शहा

इव्हीएमला विरोध करणाऱ्या देशातील २२ विरोधी पक्षांवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निशाणा साधला आहे. इव्हीएमला विरोध म्हणजे देशातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर असल्याची टीका त्यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी विरोधकांना ६ प्रश्नं विचारली आहेत. पराभवाने विचलित झालेले २२ पक्षं देशातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थितीत करुन जगात आपला देश आणि आपल्या लोकशाही प्रतिमेची छबी धुळीस मिळवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

अमित शहांनी विचारलेली ६ प्रश्नं...
१. EVM च्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या या विरोधी पक्षांनी कधी ना कधी EVM द्वारे झालेल्या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे.
जर त्यांना EVM वर विश्वास नसेल तर या पक्षांनी निवडणूक जिंकल्यानंतर सत्तेची सूत्रे का स्वीकारली ?

२. देशातील सर्वोच्च न्यायालयाने तीनहून अधिक पीआयएल विचारात घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ VVPAT मोजण्याचा आदेश दिले आहेत.

तर मग तुम्ही लोक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात काय ?

४. विरोधी पक्षांनी EVM च्या विषयावर सहा टप्प्यातील मतदान समाप्त झाल्यानंतर वाद सुरु केला. एक्झिट पोलनंतर त्याची तीव्रता वाढली. 

एक्झिट पोल EVM च्या आधारावर नाहीतर मतदाराला विचारलेल्या प्रश्नावरुन केला जातो. अंतः एक्झिट पोलच्या आधारावर तुम्ही EVMच्या विश्वसनीयतेवर असे प्रश्न उपस्थितीत करु शकता ?

५. EVM मध्ये गडबड केली जात असल्याच्या आरोपावरुन निवडणूक आयोगाने सार्वजनिकरित्या आव्हानही दिले होते. परंतु, कोणत्याच विरोधी पक्षाने हे आव्हान स्वीकारले नाही. 

त्यानंतर निवडणूक आयोगाने EVM ला VVPATशी जोडून निवडणूक प्रक्रिया आणखी पारदर्शी केली. VVPAT प्रक्रिया आल्यानंतर मतदाता मत दिल्यानंतर आपले मत कोणाला गेले हे पाहू शकतो. ही प्रक्रिया इतकी पारदर्शी असतानाही यावर प्रश्न उपस्थितीत करणे उचित आहे का ? 

६. काही विरोधी पक्ष निवडणूक निकाल अनुकूल न आल्यास 'हातात शस्त्र घेणे' आणि 'रक्ताचे पाट वाहतील' सारखी आक्षेपार्ह वक्तव्ये देत आहेत.