पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगाल:अमित शहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार, पोलिसांचा लाठीचार्ज

अमित शहा, कोलकाता (ANI)

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये रोड शो केला. या रोड शोमध्ये मध्य कोलकातातील शाहिद मिनारते उत्तर कोलकाता येथील स्वामी विवेकानंद यांच्या निवासस्थानापर्यंत हा रोड शो करण्यात येत आहे. शहा यांच्याबरोबर उत्तर कोलकाता आणि दक्षिण कोलकाताचे उमेदवार राहुल सिन्हा आणि चंद्रकुमाकर बोस उपस्थित आहेत. दरम्यान, कोलकाता विद्यापीठातील विद्यार्थी आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात काही पत्रकार जखमी झाल्याचे 'टाइम्स नाऊ'ने म्हटले आहे. या रोड शो दरम्यान जाळपोळही करण्यात आली. पोलिसांनी लाठीचार्जही केला आहे.

बंगालमध्ये तणावःअमित शहांच्या रोड शो पूर्वी भाजपचे पोस्टर्स हटवले

तत्पूर्वी, भाजपच्या रोड शो आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पोस्टर हटवण्यात येत असलेला व्हिडिओ समोर आला. या प्रकारामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप केला आहे. सरकारी यंत्रणेचा भाजपविरोधात दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 BJP National President Amit Shah roadshow in North Kolkata West Bengal