पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवारावर दोनदा हल्ला

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवारावर हल्ला

पश्चिम बंगालमधील घाटल लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्यावर रविवारी सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना दोनदा हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा एक अंगरक्षक जखमी झाला असून, भारती घोष या सुद्धा किरकोळ जखमी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला आहे.

दीदी, तुमची थप्पड माझ्यासाठी आशीर्वाद - नरेंद्र मोदी

एका घटनेमध्ये भारती घोष यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये त्यांचा एक अंगरक्षक जखमी झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत भारती घोष भाजपच्या मतदान सहायकाला मतदान केंद्रांमध्ये घेऊन जात असताना काही महिलांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. केशपूरमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. 

केशपूरनंतर दोगाचियाकडे जात असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याच्या दिशेने दगडफेक करण्यात आली त्याचबरोबर हातबॉम्बही फेकण्यात आले. या घटनेनंतर काही सुरक्षारक्षकांनी तिथे जमलेल्या नागरिकांवर लाठीमार केला. 

विश्लेषण : 'फिल गुड' मुद्द्यामुळे मोदी जिंकणार की हारणार?

मला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून जाणीवपूर्वक हे हल्ले करण्यात आल्याचा आरोप भारती घोष यांनी केला आहे. त्यांनी माझ्यावर हल्ले केलेत आणि मी जखमी झाली आहे. माझ्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याची माहिती साफ खोटी आहे, असे भारती घोष यांनी 'पीटीआय'ला सांगितले.