पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पंतप्रधान पदाची लढाई एकतर्फी'

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाची लढाई एकतर्फी आहे, असा दावा शुक्रवारी केला आहे. यासोबतच त्यांनी मोदीसरकारला 2014 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता केवळ 13 दिवस बाकी आहेत. भारतीय मतदार जागृत नसून कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, या आशेवर विरोधकांमध्ये गुप्त किंवा उघडपणे चर्चा सत्र सुरु आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.  

कर्नाटक सरकार संकटात! काँग्रेसचे २० आमदार संपर्कात, येडियुरप्पांचा दावा

जेटली यांनी 'दि होप्स ऑफ लूजर्स' नावाच्या ब्लॉकच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान पदाची शर्यतही जवळ-जवळ एकतर्फी आहे. जनतेला पाच वर्ष स्थिर सरकार हवे आहे. पाच महिन्यांसाठी नाही. यासाठी त्यांच्याकडे मोदी विरुद्ध विखुरलेले विरोधक असा पर्याय आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, मतदार विवेकावर विश्वास ठेवतील. यावेळी 2014 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आता राहुल गांधी सॅम पित्रोदांना पदावरून दूर करणार का?, जेटलींचा सवाल

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपावा 282 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ 44 जागांवर समाधान मानावे लागले होते.  विरोधकांना भारतीय मतदार सुज्ञ किंवा बुद्धीमान वाटत नसावा, त्यामुळे ते कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज बांधत आहेत. 23 मेला त्यांचा हा अंदाज खोटा ठरेल, असा उल्लेख जेटलींनी आपल्या लेखात केला आहे.