पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममता बॅनर्जींची वर्तणूक सद्दाम हुसेनसारखीः विवेक ओबेरॉय

विवेक ओबेरॉय आणि ममता बॅनर्जी

कोलकाता येथे मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बुधवारी दिवसभर भाजप-टीएमसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. या वादात आता चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही उडी घेतली आहे. विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना इराकचा तत्कालीन हुकूमशहा सद्दाम हुसेन याच्याशी केली आहे.

प्रियांकांना लगेच का नाही सोडले, सुप्रीम कोर्टने बंगाल सरकारला फटकारले

निवडणुकीनंतर रिलीज होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका निभावणाऱ्या विवेक ओबेरॉय याने ममता बॅनर्जी यांच्या लोकशाहीला धोका असल्याच्या वक्तव्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत टि्वट केले आहे. 'मला कळत नाहीये की दीदींसारख्या सन्मानित महिला सद्दाम हुसेन सारखी वर्तणूक का करत आहेत. विडंबन पाहा, लोकशाही धोक्यात आहे आणि त्याला स्वतः हुकूमशहा दीदींपासून धोका आहे. आधी प्रियांका शर्मा आणि आता तेजिंदर पालसिंग बग्गा..ही दादागिरी आता चालणार नाही. #SaveBengalSaveDemocracy #FreeTajinderBagga', असे त्याने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

FIR ला आम्ही घाबरत नाही, अमित शहांचे ममतांना प्रत्युत्तर

दरम्यान, सोशल मीडियावर ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रियांका शर्मा नावाच्या भाजप कार्यकर्तीला अटक करण्यात आले होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाल्यानंतर प्रियांका शर्मा यांना बुधवारी मुक्त करण्यात आले.

बंगाली व्यक्तीच भाजपचा मुख्यमंत्री होईल - अमित शहा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 actor vivek oberoi slams on west bengal cm mamata banerjee and compare her to dictator saddam hussain