पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश

सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश

बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

'ज्या प्रकारे माझ्या वडिलांनी अटलजींसोबत मिळून काम केलं,  आता मीदेखील मोदींसोबत मिळून  देशासाठी काम करणार आहे. बोलण्यापेक्षा काम करून दाखवण्यावर माझा जास्त विश्वास  आहे', असंही ते म्हणाले. सनी देओल यांचे वडील धर्मेंद हे भाजपाचे बिकानेरचे माजी खासदार आहेत, तर त्यांच्या पत्नी हेमा मालिनी मथुराच्या भाजपा खासदार आहेत. आता सनी  यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. 

सनी देओल यांनी गेल्या आठवड्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हापासूनच  सनी देओल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. सनी यांना गुरुदासपूरमधून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, असं म्हटलं जात आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 Actor Sunny Deol joins Bharatiya Janata Party in presence of Piyush Goyal and Nirmala Sitharaman