पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस नेत्याने अर्थमंत्र्यांना म्हटले 'निर्बला' सीतारमण

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी

लोकसभेमध्ये सोमवारी अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष आमने-सामने आले. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे  सभागृहात गोंधळ झाला. कॉर्पोरेट टॅक्सवर चर्चा करताना अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना 'निर्बला' सितारमण असे म्हटले.

अमित शहांनी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याची दिली डेडलाईन

दरम्यान, सोमवारी कॉर्पोरेट टॅक्सवर लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'कधीकधी मी तुमचा खूप आदर करतो, परिस्थिती पाहून मला असे बोलावेसे वाटते की तुम्हाला निर्मला सितारमण ऐवजी निर्बला सितारमण असे बोलणे योग्य वाटते की नाही. कारण तुम्ही मंत्री पदावर आहात. मात्र तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करता किंवा नाही हे मला माहित नाही.'

'पंकजा मुंडे पक्ष बदलण्याबाबतच्या चर्चेत तथ्य नाही'

दरम्यान, काँग्रेस पक्ष वारंवार अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सतत भाजपवर टीका केली जात आहे. अशावेळी काँग्रेस नेत्याचे लोकसभेमधील वक्तव्यामुळे भाजप नेते संतप्त झाले आहेत. याआधी रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी घुसखोर म्हटले होतो. त्यामुळे लोकसभेत गोंधळ झाला होता. भाजपने अधीर रंजन चौधरी यांच्याकडून माफी मागणी केली होती. 

मंत्र्यांना बंगल्याचे वाटप जाहीर; या ठिकाणी राहणार हे मंत्री