पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

कोरोना विषाणू

संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील अर्थात लोकसभेतील एका सफाई कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर तीन अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. अर्थात हा कर्मचारी थेट संसदेच्या इमारतीमध्ये काम करीत नाही. तर तो लोकसभेच्या ताब्यात असलेल्या ३६ जीआरजी मार्गावरील एका इमारतीमध्ये काम करतो.

पालघर प्रकरणाचे राजकारण करु नका, त्याचा कोरोनाशी संबंध नाही: पवार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ मार्चला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. तेव्हापासून हा कर्मचारी त्याच्या घरातच आहे, अशीही माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्याला बरे वाटत नसल्यामुळे तो राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेला होता. तिथे त्याची तपासणी करण्यात आली. त्याचा ईसीजीही काढण्यात आला. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्याला ताप, खोकला आणि अंगदुखी असा त्रास होऊ लागला. 

हा कर्मचारी १८ एप्रिलला पुन्हा एकदा तपासणीसाठी त्याच रुग्णालयात गेला. यावेळी त्याची कोविड १९ साठी आवश्यक चाचणी करण्यात आली. चाचणीचे अहवाल आले आहेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत. याचाच अर्थ संबंधित कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे, असे दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

रुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेतली असून, त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबामध्ये पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे आहेत.