पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जय शिवराय, जय महाराष्ट्र! अमोल कोल्हेंसह काही खासदारांनी घेतली मराठीत शपथ

नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे

सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवीन खासदारांचा शपथ विधी सोहळा पार पडला. राज्यातील काही नवनिर्वाचित खासदारांनी खासदारकीच्या सदस्यत्वाची शपथ घेताना मराठी भाषेची निवड केली. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह अन्य पक्षातील काही खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली. 

लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देणे अयोग्य - नवनीत कौर 

अमोल कोल्हे यांच्यासह मनोज कोटक, विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर, प्रितम मुंडे, सदाशिव लोखंडे, नवनीत कौर राणा , इम्तियाज जलील, श्रीरंग बारणे, धर्यशील माने यांनी मराठीतून शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले.

सामर्थ्यवान विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये महत्त्वाचा - नरेंद्र मोदी

पूनम महाजन, सुप्रिया सुळे, गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी यांनी हिंदी भाषेतून  तर सुजय विखे, उदयनराजे भोसले या खासदारांनी  इंग्रजी भाषेतून शपथ घेतली.