पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्याच जागेवर विद्यासागर यांचा पुतळा उभारणार, मोदींची ग्वाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी (ANI/Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) ईश्वरचंद विद्यासागर यांच्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) गुंडांनी दादागिरी करत महान समाजसुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार त्याच जागेवर पंचधातूचा एक भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प. बंगालमध्ये आज माझ्या प्रचारसभा होणार आहेत. दीदी या प्रचारसभा होऊ देतात की नाही ते पाहुयात, असा टोलाही त्यांनी लगावला. 

निवडणूक आयोग दबावाखाली, ममतांच्या समर्थानंतर मायावती यांचा आरोप

मोदी हे उत्तर प्रदेशमधील मऊ येथील एका प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, टीएमसीच्या गुंडांची दादागिरी परवा रात्री पाहायला मिळाली. कोलकाता येथे अमित शहांच्या रोड शो दरम्यान टीएमसीच्या गुंडांनी ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. असे कृत्य करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. ईश्वरचंद विद्यासागर यांच्या दृष्टीकोनासाठी समर्पित असलेले आमचे सरकार त्याच जागेवर पंचधातूची एक भव्य मूर्ती स्थापन करेल, अशी घोषणा त्यांनी केली. 

पश्चिम बंगालमधील हिंसाचार राज्यातील राजकीय परिवर्तनाचे संकेत

ईश्वरचंद विद्यासागर हे फक्त बंगालच नव्हे तर भारतातीलच महान व्यक्ती आहेत. ते महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ इतकेच नव्हे तर गरीब आणि दलितांचे संरक्षकही होते. महिलांच्या अधिकारांसाठी त्यांनी त्याकाळी आवाज उठवला होता. भाजप सरकारच्या मुळात बंगालची सांस्कृतिक भक्ती आहे. वेद ते विवेकानंद यांच्यापर्यंत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून ते श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत, आमच्या चिंतन-मननला बंगालच्या ऊर्जेनेही प्रभावित केले आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.