पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम बंगालमधील हिंसाचार राज्यातील राजकीय परिवर्तनाचे संकेत

पश्चिम बंगालमधील हिंसाचार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्य तेथील हिंसाचारामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचार होतो आहे. त्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसते. पण हिंसा किंवा हिंसाचार हा नेहमी राजकीय परिवर्तनाचे संकेत देत असतो. 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी'चे संचालक संजय कुमार यांनी हे मत व्यक्त केले आहे. 

संजय कुमार यांचे असे म्हणणे आहे की, पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार हा वर्चस्वाची लढाई आहे. त्यात हा हिंसाचार अगदी निवडणुकीच्या काळातच होतो आहे. त्यामुळे तो राजकीय परिवर्तनाचे संकेत देतो. जेव्हा एखाद्याच्या वर्चस्वाला कोणीतरी आव्हान देतो. साहजिकच ज्याचे वर्चस्व असते, तो नवी ताकद रोखण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी नवी ताकद जुन्या ताकदीला पुरेपूर आव्हान देते. 

ममता बॅनर्जींची वर्तणूक सद्दाम हुसेनसारखीः विवेक ओबेरॉय

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. यावेळी भाजप तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तिथे राजकीय हिंसाचार सुरू आहे. आपले राजकीय वर्चस्व टिकून राहावे, यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. पण हेच राजकीय परिवर्तनाचे संकेत आहेत, असे संजय कुमार यांनी सांगितले. आता परिवर्तन किती गंभीरपणे होणार आहे हे लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यावरच स्पष्ट होईल. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा आणि मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता जास्त आहे.  

प. बंगाल: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुदतीपूर्वीच प्रचार बंदी

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे पक्षही निवडणूक लढवित आहेत. पण त्यांची काहीच चर्चा नाही. अशा वेळी निवडणुकीचा केंद्रबिंदू तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्याभोवतीच केंद्रित झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये २९ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला अवघी १० टक्के मते मिळाली होती. यावेळच्या निवडणुकीत या दोघांच्या मतांच्या टक्केवारी आणखी घट होण्याचा अंदाज आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha elections 2019 violence in amit shah rally in west bengal may be sign of political change