पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ग्राउंड रिपोर्ट' आमच्या बाजूनं, राम माधव यांचा दावा

भाजप सरचिटणीस राम माधव

भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी एनडीए सरकार सत्ता स्थापन करेल, असा दावा केला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, राम माधव यांनी ग्राउंड रिपोर्टच्या आधारे हा दावा केला असून २०१४ प्रमाणेच पुन्हा एकदा भाजपची कामगिरी दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करत एनडीए बहुमतात स्थिर सरकार स्थापन करेल, असे राम माधव यांनी म्हटले आहे.  

यावेळी राम माधव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांना राजकारणाशिवाय दुसरे काही दिसत नाही. बंगालमध्ये हिंसाचार वाढला आहे. त्याठिकाणी हुकूमशाही आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी निवडणूक आयोगाने केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याचा दाखला देत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.  

भाजप सरचिटणीसांनी शशी थरुर यांच्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या ट्विटवरील प्रतिक्रियेवरही भाष्य केले. त्यांचे शेजारील राष्ट्रावर असणारे प्रेम आणि आमच्याबद्दल त्यांच्या मनात असणारा तिरस्कार सर्वज्ञात आहे. ते आमच्या नेत्यांना शिवीगाळ करतात आणि सीमारेषेपलीकडील लोकांसंदर्भात प्रेमाची भावना व्यक्त करतात. कोणती गोष्ट बरोबर आहे आणि कोणती गोष्ट चुकीची आहे, याचा त्यांनी विचार करावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha Elections 2019 Ram Madhav Says based on ground report bjp will perform better and nda form government