काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान हा सुद्धा यावेळी पहिल्यांदाच मतदान करणार होता. पण रविवारी दिल्लीत झालेल्या सहाव्या टप्प्यातील मतदानावेळी तो न दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी रविवारी मतदान केले. पण रेहान लंडनला गेलेला असल्याने त्याने आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. खुद्द प्रियांका गांधी यांनीच ही माहिती दिली.
लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : प्रियांका गांधी
अमेठीमध्ये १० एप्रिलला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये रेहान आणि त्याची बहीण मिराया हे दोघेही सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दिला होता. रविवारी दिल्लीत झालेल्या मतदानावेळी राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुद्धा मतदान केले. सहाव्या टप्प्यात एकूण ५९ जागांसाठी रविवारी मतदान झाले. दिल्लीसह, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये रविवारी मतदान झाले. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये नोंदले गेले. तर सर्वांत कमी मतदान दिल्लीमध्ये झाले.
मोदींकडून द्वेषाचा, आमच्याकडून प्रेमाचा वापर - राहुल गांधी
लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आता बाकी आहे. ते येत्या रविवारी, १९ मे रोजी होणार आहे. त्या दिवशी ५९ जागांसाठी मतदान होणार आहे.