पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका गांधींकडून उत्तर प्रदेशात पत्रास्त्र, अनेकांना पाठविली वैयक्तिक पत्रे

प्रियांका गांधी

पूर्व उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रभारी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी येथील वेगवेगळ्या मतदारसंघातील निवडक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना पत्रे लिहिली आहेत. त्यामध्ये तुमच्या प्रश्नांमध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालेन, असे आश्वासन देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील एकूण १४ लोकसभा मतदारसंघातील लोकांना ही पत्रे पाठविण्यात आली आहे. या १४ मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होते आहे.

अंगणवाडी सेविका, 'मनरेगा'वर काम करणारे कर्मचारी, आरोग्य सेविका, शिक्षक, विद्यार्थी, प्रशिक्षक आणि मदरशांमधील सेवक यांना ही पत्रे पाठविण्यात आली आहेत. लखनऊ, रायबरेली, अमेठी, सीतापूर, मोहनलालगंज, बांदा, फतेपूर, कौसंबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज, गोंदा, बहराइच या मतदारसंघातील लोकांना ही पत्रे पाठविण्यात आली आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून ही पत्रे संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्याचबरोबर या पत्रांतील मजकूर वैयक्तिक स्वरुपाचा आहे.

राष्ट्रवादासोबत शेतकऱ्यांची शेतीही सुरक्षित ठेवा, प्रियांकांचा भाजपला टोमणा

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसकडून अधिकाधिक महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमेठी जिल्ह्यातील कोरवामध्ये प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थानिक महिलांची एक बैठकही घेतली. 

पत्रामध्ये प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजने अंतर्गत आरोग्यासाठीची तरतूद दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर आरोग्य सेविकांना मिळणाऱ्या निधीतही वाढ करण्यात येईल, असे लिहिण्यात आले आहे.

अमेठीच्या मतदारांना राहुल गांधींचे पत्र

आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित पैसे तातडीने देण्याचे आश्वासनही पत्रामध्ये देण्यात आले आहे. एकात्मिक बालविकास सेवेसाठीची आर्थिक तरतूद वाढविण्यात येईल. त्यामुळे कुपोषण आणि लहान मुलांमधील इतर समस्यांवर मात केली जाईल, असेही आश्वासन पत्रामध्ये देण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Priyanka Gandhi tries to win over UP voters with personalised letters