पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींना वाटते ढगाळ हवामानामुळे ते लोकांच्या रडारवर येणार नाहीत, प्रियांकांचा टोला

प्रियांका गांधी

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवेळी ढगाळ हवामान आणि रडार संदर्भात केलेले एक वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या वक्तव्यावरून त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदींच्या त्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन इंदौरमधील रोड शोवेळी त्यांच्यावर टीका केली.

 ..तर सनीला निवडणुकीला उभे केले नसते- धर्मेंद्र

राजवाडा चौकातील रोड शोवेळी प्रियांका गांधी म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात लोकांना जुमल्यांशिवाय दुसरे काहीही दिले नाही. त्यांना असे वाटते की ढगाळ हवामानामुळे ते कधीही लोकांच्या रडारवर येणार नाहीत. हिंदीतून केलेल्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी प्रियांका गांधी यांना जोरदार प्रतिसाद दिला.

नरेंद्र मोदी यांनी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, बालाकोट एअर स्ट्राईकच्या दिवशी हवामान ढगाळ हवामान होते. त्यामुळे तज्ज्ञांना असे वाटत होते की एअरस्ट्राईकची कारवाई पुढे ढकलावी. पण मी त्यावेळी हस्तक्षेप करीत ढगाळ हवामानामुळे आपल्या विमानांना फायदाच होईल. ते रडारच्या कक्षेत येणार नाही, असे सांगितल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. 

सॅम पित्रोदा बोलले ते चुकीचेच, देशाची माफी मागायला हवी - राहुल गांधी

प्रियांका गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधिक टीका केली. मोदी खूप मोठे संरक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी एकट्यानेच ठरवून टाकले की ज्या कंपनीने एकाही विमानाची निर्मिती केलेली नाही. त्यांना या विमानाच्या निर्मितीचे कंत्राट द्यायचे. त्या कंपनीला जमीनही द्यायची. पण ढगाळ हवामान असू दे की स्वच्छ सूर्यप्रकार असू दे या माणसाचे राजकारण काय आहे, हे लोकांनी ओळखले आहे, असे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Priyanka Gandhi mocks PM Modis cloud theory says hes on peoples radar