पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Loksabha Election 2019 : पाचव्या टप्प्यातील मतदारांसाठी नरेंद्र मोदी यांनी केले नवे आवाहन

नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये मतदान होते आहे. सकाळपासून सगळी शांततेत मतदान सुरू आहे. दरम्यान, मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून जनतेला अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यावेळीही नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी ट्विट करून मतदारांना मतदानासाठी जाण्याचे आवाहन केले.

Loksabha Election 2019 LIVE : मायावती, राजनाथ सिंह यांनी केले मतदान

आपल्या ट्टिवटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, जे मतदार पाचव्या टप्प्यात मतदान करणार आहेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदान करावे. 

भारताचे भविष्य सुनिश्चित करण्याचे आणि लोकशाही आणखी सुदृढ करण्याचे मतदान हे सर्वात परिणामकारक माध्यम आहे. माझी अशी आशा आहे की तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत भाग घेतील.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासून नरेंद्र मोदी यांनी तरुण मतदारांना अधिकाधिक प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आपले पहिले मत हे देशातील शहीदांना समर्पित करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. शहीदांच्या हौतात्म्याचे नरेंद्र मोदी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर कऱण्यात आला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha elections 2019 pm narendra modi appeal to voters as the fifth phase of voting begins