पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शीख दंगलीतील एकाला फाशीपर्यंत पोहचवले, इतरांनाही शिक्षा होईल'

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंजाबमधील भंटिंडा येथील प्रचार सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा शीख दंगलीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा साधला. करतारपूर साहिब पाकिस्तान प्रांतात जाण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप मोदींनी आपल्या भाषणामध्ये केला. यावेळी त्यांनी १९८४ मध्ये पंजाबमध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगलीचाही दाखला देत काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसने आतापर्यंत फक्त समिती आणि आयोग स्थापन केला मात्र  कारवाई झाली नाही. आम्ही दोषींवर कारवाई करुन त्यांना शिक्षा देऊ."  

'हुआ तो हुआ' हाच काँग्रेस-महाआघाडीचा मंत्र: मोदी

मोदी म्हणाले की, "१९८४ च्या शीख दंगलीला आज ३५ वर्षे होत आहेत. काँग्रेसमुळे या घटनेतील पीडितांना न्याय मिळाला नाही. मागील काँग्रेस सरकारने फक्त समिती आणि आयोग स्थापन करुन कारवाई लांबवण्याचा प्रयत्न केला." ते पुढे म्हणाले "या प्रकरणात ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांना काँग्रेसने मंत्रीपद दिले. निवडणुकांच्या वेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. पंजाबचे प्रभारीपदावर बसवले. ज्यावेळी विरोध झाला त्यावेळी त्यांना हटवण्याचे नाटक करण्यात आले. आज कांग्रेसने त्याच व्यक्तीला मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री बनवले." 

१९८४ च्या शीख दंगलीच्या आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात ते म्हणाले की, "आपल्या चौकीदाराने तुम्हाला न्याय देण्याचा वादा केला होता. बादल साहेबांच्या आशिर्वादाने आज मी तुम्हाला सांगू शकतो की १९८४ च्या दंगलीतील एका आरोपीला फाशी पर्यंत पोहचवले आहे. काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि जे उरले आहेत त्यांनाही लवकरच शिक्षा होईल."  

सॅम पित्रोदा बोलले ते चुकीचेच, देशाची माफी मागायला हवी - राहुल गांधी

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याचाही त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, "पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. जे काँग्रेसच्या मनात आहे तेच बाहेर आले. नामदारच्या गुरुनेच ते जगजाहिर केले. त्यांच्या या कृत्याबद्दल नामदाराने आपल्या गुरुला रागवायला पाहिजे का?" असा सवाल उपस्थित करुन त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha elections 2019 pm modi rally in punjabs bathinda says wil punish those involved in 1984 riots