इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्यांच्या या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांची एक बैठक मंगळवारी संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये झाली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी घटक पक्षातील नेत्यांसाठी भोजनही आयोजित केले होते. या बैठकीला एकूण ३६ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये एनडीएची पुढील पाच वर्षांची धोरणरेषाही निश्चित केली गेली.
NDA कडून पंतप्रधान पदाच्या उमेदवारपदी मोदींचीच निवड
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीबद्दल माहिती देताना सांगितले की, एक प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला. २०१९ मधील निवडणूक ही देशासाठी निर्णायक असल्याचे ठरविण्यात आले. २०२२ पर्यंत देशाला विकसित, समृद्ध आणि सर्वसमावेशक करण्याचा संकल्पही या बैठकीत करण्यात आला.
बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेची तुलना तीर्थयात्रेशी केली. ही निवडणूक केवळ राजकीय पक्षानेच लढविली नाही. तर लोकांनीही त्यामध्ये सहभाग घेतला, असेही निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले. भारतीय लोकशाहीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रमुख घटक झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्याचबरोबर गेल्या सरकारच्या उज्ज्वला योजना, जनधन योजना, आयुषमान योजना, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या योजनेची प्रशंसा करणारा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
निकालापूर्वीच भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींची २ हजार किलो मिठाईची ऑर्डर
निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये जे काही घडले, त्याची निंदा या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर व्होट बॅंक जपण्यासाठी केले जाणारे राजकारण यावरही खेद व्यक्त करण्यात आला.