पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्रिशंकू लोकसभा अस्तित्त्वात आल्यास पुढील हालचालींसाठी UPA सज्ज

राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच आता सत्ता स्थापन कऱण्यासाठी काय काय करता येऊ शकते, याचा विचार देशातील दोन प्रमुख आघाड्यांकडून केला जाऊ लागला आहे. एकीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने NDA मंगळवारी रात्री संभाव्य समीकरणांबद्दल चर्चा केली. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीसुद्धा UPA निकाल लागल्यानंतर एनडीएला पुरेसे बहुमत न मिळाल्यास लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करीत आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारा लोकसभेतील संख्याबळाचा २७२चा आकडा उद्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

विरोधकांना EVM ची चिंता, २२ पक्षांनी EC ला दिल्या दोन आयडिया

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी अहमद पटेल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्या बैठका झाल्या. यामध्ये एक सविस्तर आराखडाही निश्चित करण्यात आला आहे, असे या घटनेशी संबंधित सूत्रांनी 'हिंदूस्थान टाइम्स'ला सांगितले. 

केंद्रात गैरएनडीए सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्ष युपीएला कसा पाठिंबा देतील, याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी लेखी मसुदेही तयार करून ठेवण्यात आले आहेत. जर त्रिशंकू लोकसभा अस्तित्त्वात आली, तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा लवकरात लवकर दावा करण्यासाठी विरोधी पक्षांकडून ही तयारी करण्यात आली आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीनंतर उदभवलेल्या परिस्थितीत काँग्रेसने ज्या पद्धतीने पावले उचलली होती. तशीच लोकसभा निवडणुकीनंतर गरज पडल्यास उचलली जातील, असे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.

'मतदान यंत्रात फेरफार केला जाणार नाही हे पाहणे निवडणूक आयोगाचीच जबाबदारी'

कर्नाटकमध्ये निकाल लागल्यानंतर लगेचच काँग्रेसने जनता दल सेक्युलर पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मुख्यमंत्रीपदही त्यांना देण्यास काँग्रेस तयार झाला. कोणत्याही स्थितीत तिथे भाजपला सत्ता स्थापन करून द्यायची नाही, यासाठीच ही रणनिती आखण्यात आली आणि ती यशस्वी ठरल्याचे नंतर घडलेल्या घडामोडींवरून दिसून आले. असेच नियोजन लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर करण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Opposition lays ground to make quick claim if NDA tally falls short