पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिसरी आघाडी शक्य नाही, स्टॅलिन यांचे मत

के चंद्रशेखर राव आणि एम. के स्टॅलिन

भाजप किंवा काँग्रेस या दोन्हींपैकी एकाही पक्षाला सोबत न घेता तिसरी आघाडी केंद्रात सत्तेत येणे शक्य नसल्याचे द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष एम. के स्टॅलिन यांनी म्हटले आहे. पण या संदर्भात २३ मे रोजी निकाल लागल्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र लोकसभा निकाल अंदाज : या आहेत तीन शक्यता

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतीच स्टॅलिन यांची भेट घेतली होती. केंद्रात भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांना न घेता तिसऱ्या आघाडीची बांधणी करून सत्ता मिळवण्यासाठी चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. त्यासाठीच ते विविध प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या भेटीनंतर स्टॅलिन यांनी वरील भूमिका मांडली आहे. 

दरम्यान, चंद्रशेखर राव तिसऱ्या आघाडीसाठी मला भेटायला आले नव्हते. तामिळनाडूतील विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी ते येथे आले होते. माझी केवळ त्यांनी सदिच्छा भेट घेतली आहे, असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. 

मोदींना वाटते ढगाळ हवामानामुळे ते लोकांच्या रडारवर येणार नाहीत, प्रियांकांचा टोला

स्टॅलिन यांची भेट घेण्यापूर्वी चंद्रशेखर राव यांनी श्री रंगनाथा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. भाजप आणि काँग्रेस यांना बाजूला ठेवून तिसरी आघाडी सत्तेत येणे शक्य नाही. तरीही २३ मे नंतर पुढील निर्णय घेऊ असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.