पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Lok Sabha Election 2019: भेटवस्तू पाठवेन पण मत देणार नाही, ममतांचे मोदींना उत्तर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ते आणि मिठाई पाठवतात असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मोदींच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, ममता बॅनर्जींनी आपली भूमिका जाहीर केली असून सणानिमित्त लोकांना मी भेटवस्तू, मिठाई पाठवेन पण त्यांना कधी मत देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी लोकांना रसगुल्ला पाठवते. सणानिमित्त मी लोकांना भेटवस्तू पाठवते, चहाला बोलावते. पण मी त्यांना मत देणार नाही, असे वक्तव्य त्यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता केले. पश्चिम बंगाल मधील हुगळी जिल्ह्यात आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. 

ममतादीदी माझ्यासाठी कुर्ते आणि बंगाली मिठाई पाठवतात - नरेंद्र मोदी

माझ्यात आणि ममता बॅनर्जी यांच्यात चांगले संबंध असल्याचे मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी अक्षय कुमार याला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले होते. ममतादीदी स्वतः माझ्यासाठी कुर्ते निवडून मला पाठवतात. त्याचबरोबर मला बंगाली मिठाई आवडत असल्यामुळे त्या स्वतः माझ्यासाठी बंगाली मिठाई पाठवतात, असे मोदी यांनी म्हटल्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 

त्याचबरोबर बांगलादेशाच्या पंतप्रधान आपल्याला ढाक्यातून बंगाली मिठाई पाठवतात, हे समजल्यावर ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्यासाठी बंगाली मिठाई पाठविण्यास सुरुवात केली, असेही मोदी यांनी सांगितले होते.

दरम्यान, ममतांनी मोदींवर टीकाही केली. नोटबंदीच्या माध्यमातून मोदींनी काळा पैसा पांढरा केला. यातून त्यांनी मते खरेदी केल्याचा आरोप केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Might send gifts but wont give single vote Mamatas reply to PM Modi