पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममतांचा RSS-BJP वर गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांनी केंद्रीय दलाच्या गणवेशात बंगालमध्ये प्रवेश केल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. दक्षिण परगणा जिल्ह्यातील बसंती परिसरातील प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

दिल्लीत बोगस मतदान, आप उमेदवाराकडून भाजपवर आरोप

यावेळी त्या म्हणाल्या की, मी केंद्रीय दलाचा अपमान करत नाही. परंतु त्यांना मतदारांना प्रभावित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय दलाच्या नियुक्तीच्या नावाखाली भाजप सरकार जबरदस्तीने आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांना पाठवत आहे. मला शंका वाटते की, आरएसएस कार्यकर्त्यांना केंद्रीय दलाच्या वेशात पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात येत आहे. 

लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : प्रियांका गांधी

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील घाटल लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या अंगरक्षकावर झालेल्या गोळीबारात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता जखमी झाल्याचेही सांगितले. केंद्रीय दलाचे कर्मचारी रांगेत उभे असलेल्या मतदारांना भाजपला मतदान करण्यास सांगत आहेत. ते असे कसे करु शकतात? भाजपला मतदान करा असा संदेश देणे हे केंद्रीय दलाचे काम आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात आठ जागांसाठी मतदान होत असून याठिकाणी केंद्रीय दलाला तैनात करण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha elections 2019 mamata banerjee says bjp rss workers entering bengal in central forces dress