पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

FIR ला आम्ही घाबरत नाही, अमित शहांचे ममतांना प्रत्युत्तर

अमित शहा

पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोवेळी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद बुधवारीही उमटले. या प्रकरणी भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. निवडणूक आयोगानेही या प्रकऱणाची गंभीर दखल घेतली असून, पश्चिम बंगालमधील निवडणूक निरीक्षकांसोबत आयोग बैठक घेत आहे. लोकसभा निवडणुकीत सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान उरलेले असताना पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विविध घटनांनी आतापर्यंतच्या निवडणुकीला गालबोट लागले आहे.

बंगाली व्यक्तीच भाजपचा मुख्यमंत्री होईल - अमित शहा

अमित शहा यांच्या रोड शोवेळी झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. भाजप कोणत्याही एफआयआरला घाबरत नाही, असे वक्तव्य अमित शहा यांनी केले आहे. ते म्हणाले, भाजप देशातील प्रत्येक राज्यामध्ये निवडणूक लढवत आहे. पण सहा टप्प्यांमध्ये आतापर्यंत कुठेही हिंसाचार झाला नाही. आता केवळ पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला यावरून तृणमूल काँग्रेसच याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे दिवस भरले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोलकातामधील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकसान केले आणि आता ते आमच्यावर आरोप करीत आहेत, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

अमित शहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार, पोलिसांचा लाठीचार्ज

अमित शहा यांनी रोड शोसाठी बाहेरून माणसे आणली होती. त्यांनीच हा हिंसाचार घडवून आणला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तृणमूलच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Live Updates Not scared of FIR says Amit Shah on Bengal police case against him