पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात ३०० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, पुन्हा NDA ची सत्ता येईल - अमित शहा

अमित शहा (ANI)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपने पत्रकार परिषद आयोजित करुन अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान पत्रकार परिषदेत उपस्थितीत राहण्याची पहिलीच वेळ होती. परंतु, पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीच उत्तरे दिली. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी-नथुराम गोडसे यांच्याविषयीही शहा यांनी भाष्य केले. गोडसे-गांधी यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून दहा दिवसांत उत्तर आल्यानंतर यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी भाजपला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

प्रारंभी, या परिषदेमध्ये सुरुवातीला शहा यांनी भाजपने लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांमध्ये कशा पद्धतीने प्रचार केला आणि लोकांचा त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला, याचा पाढाच वाचला. 

साध्वी प्रज्ञा यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांनी दहा दिवसांत उत्तर द्यावे लागेल. त्यांचे उत्तर आल्यानंतर अनुशासन समिती कारवाई करेन. प्रज्ञासिंह यांना उमेदवारी म्हणजे बनावट भगवा दहशतवादाविरोधातील आमचा सत्याग्रह आहे. देशातील न्यायालयांनीदेखील भगवा दहशतवाद बनावट असल्याचे म्हटले आहे. भगवा दहशतवाद शब्दाचा वापर केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शहा यांनी केली. 

Updates:

* आमच्यामुळे हिंसा होत असेल तर देशात सगळीकडे हिंसा व्हायला हवी. माध्यमांनी ममता बॅनर्जींना विचारायला हवे की असे का होते.-अमित शहा

* बंगालमध्ये भाजपचे ८० कार्यकर्ते मारले गेले. आम्ही संपूर्ण देशात निवडणूक लढवत आहोत. इतर ठिकाणी हिंसा का होत नाही- अमित शहा

* ही निवडणूक अत्यंत सकारात्मक राहिली. निवडणुकीदरम्यान आयपीएल, बोर्डाच्या परीक्षा, रमजान, नवरात्र सर्व एकाचवेळी झाले. जेव्हा सरकार सक्षम असते तेव्हा सर्व शक्य आहे.- नरेंद्र मोदी

*  लवकरात लवकर सरकार आपला कार्यभार घेईन आणि त्वरीत निर्णय आम्ही घेऊ- नरेंद्र मोदी

* पाच वर्षांत भरीव काम केले- नरेंद्र मोदी

* प्रचाराचा  खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे- नरेंद्र मोदी

* जगाला प्रभावित करण्यासारख्या अनेक गोष्टी भारतात- नरेंद्र मोदी

* पहिल्या दिवसापासून जो उत्साह होता, तोच आजही कायम आहे- मोदी

* देशातील प्रत्येक नागरिकांचा मी आभारी- नरेंद्र मोदी

* सकारात्मक भावनेने निवडणूक झाली-नरेंद्र मोदी

* सरकार बनवणे जनतेने निश्चित केले आहे.-नरेंद्र मोदी

* गतवर्षी १७ मे रोजी सट्टेबाजांना धक्का बसला होता-नरेंद्र मोदी

* माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा माझ्या सरकारच्या ५ वर्षातील कामगिरी सांगण्याची संधी होती.- नरेंद्र मोदी

* लोकशाहीचे महत्त्व काय आहे हे सगळ्यांसमोर घेऊन जाणे हे आपले काम आहे - नरेंद्र मोदी

* देशात ३०० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, पुन्हा NDA ची सत्ता येईल - अमित शहा

* एक लाख ५८ हजार किलोमीटरचा भाग मी स्वतः फिरलो आहे. - अमित शहा

* १० हजारपेक्षा जास्त पक्षाच्या कार्यकर्त्यांशी मोदींनी विविध ठिकाणी चर्चा केली. 

* नरेंद्र मोदी यांनी १४२ प्रचारसभा घेतल्या. चार ठिकाणी रोड शो केले. या माध्यमातून साधारणपणे एक कोटी ५० लाख लोकांपर्यंत मोदी स्वतः पोहोचले.

*

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 LIVE updates At joint briefing with PM Modi Shah says campaign successful