पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेच्या निकालांनंतर ममता बॅनर्जींचे करायचे काय?, डाव्यांपुढील मोठी अडचण

ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीशिवाय (एनडीए) इतर कोणत्याही आघाडीचे सरकार येणार असेल, तर त्याला बाहेरून पाठिंबा द्यायला, डावे पक्ष तयार आहेत. पण त्यांच्या पुढे एकच अडचण आहे. तृणमूल काँग्रेसही अशा आघाडीमध्ये असणार हे जवळपास निश्चित आहे. मग त्या स्थितीत काय करायचे, हा मोठा प्रश्न डाव्या पक्षांपुढे आहे. 'हिंदूस्थान टाइम्स'ने हे वृत्त दिले आहे. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, जर ममता बॅनर्जी यांचा पक्ष अशा आघाडीमध्ये आला तर काय करायचे हा आमच्यापुढील मोठा प्रश्न आहे. आघाडीमध्ये तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणे आमच्यासाठी पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. त्याचवेळी भाजपच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला बाहेर ठेवणे हे सुद्धा आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. 

जय श्रीराम म्हणतोय, मला अटक करुन दाखवा; अमित शहांचे ममतांना आव्हान

गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ३४ जागांवर विजय मिळवला होता. मोदी लाट असतानाही तृणमूल काँग्रेसने आपला बालेकिल्ला जपला होता. डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्हीही पश्चिम बंगालमध्ये एकमेकांचे विरोधक आहेत. डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता उलथून टाकतच ममता बॅनर्जी तिथे मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यामुळे डाव्या पक्षांची सध्याची पश्चिम बंगालमधील घोषणाही 'भाजला हारवा आणि तृणमूललाही हारवा', अशीच आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले, धर्मनिरपेक्ष सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. १९९६ मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्यावेळी किंवा २००४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्यावेळीही आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. २००४ मध्ये तर काँग्रेस आणि भाजपनंतर डाव्या पक्षाच्या खासदारांची लोकसभेतील संख्या जास्त होती. तरीही आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता.

डाव्या पक्षांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा २००८ मध्ये काढून घेतला होता. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये झालेल्या अणूकरारावरून हा पाठिंबा काढून घेण्यात आला होता. 

वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीलाच फायदा: रामदास आठवले

युपीए १ च्या काळात आम्ही आमच्या ६० खासदारांच्या पाठिंब्यावर सरकारला लोकोपयोगी निर्णय घेण्यास भाग पाडले होते. माहितीचा अधिकार, भूसंपादन सुधारणा कायदा आणि मनरेगा या सारख्या सुधारणा आमच्यामुळे प्रत्यक्षात आल्या होत्या, असे सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Left ready to back non NDA govt but in a fix over Mamata Banerjee