पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींनी डाव्यांविरोधात निवडणूक लढवणे दुर्देवीः सीताराम येचुरी

सीताराम येचुरी

गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय राजकारणात मागे पडलेले डावे पक्ष आगामी निवडणुकीनंतर नवीन धर्मनिरपेक्ष सरकार स्थापण्यात महत्वाची भूमिका निभावणार असल्याचा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना व्यक्त केला. त्याचबरोबर केरळमध्ये राहुल गांधी यांनी डाव्यांविरोधात निवडणूक लढवणे दुर्देवी असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे ३ टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत ज्या भागात निवडणुका झाल्या तिथे भाजपचे १३० विद्यमान खासदार आहेत. या जागा राखणे भाजपसाठी कठीण आहे. आता उर्वरित २४१ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. २०१४ मध्ये भाजपने यापैकी १६१ जागांवर विजय मिळवला होता. या जोरावरच भाजपने सत्ता प्राप्त केली होती. सद्यस्थितीत इतक्या जागा मिळवणे भाजपसाठी कठीण आहे. यावेळी त्यांना बहुमत मिळणार नाही. 

यंदा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. युती-आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. भारतात अनेकवेळा निवडणुकीनंतर आघाडी होऊन सरकार सत्तेवर आले आहेत. १९७७ मध्ये आणीबाणीच्या काळात निवडणुकीनंतरच जनता सरकार स्थापन झाले. १९८९ मध्ये व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार, १९९८ मधील एनडीए सरकार आणि २००४ मध्ये यूपीए सरकार हे निवडणुकीनंतरच्या आघाडीनंतरच स्थापन झाले होते. यावेळीही समविचारी पक्ष निवडणुकीनंतर एकत्र येतील आणि देशाला एक चांगला पर्याय देत धर्मनिरपेक्ष सरकार देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

भाजप आणि तृणमूल काँग्रेसचा पराभव करणे हा आमचा मुख्य उद्धेश आहे. आम्ही काँग्रेससमोर ६ जागांवर परस्पर सहमतीने लढण्याचा प्रस्ताव दिला होता. आमचा प्रस्ताव का स्वीकारला नाही याचे काँग्रेसने उत्तर द्यावे, असा जाब त्यांनी विचारला. 

राहुल गांधी यांनी केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. मी त्यांना सांगितले की, तुमची आजी आणि आईने कर्नाटकमधून निवडणूक लढवली. मग तुम्ही तिथे लढून भाजपचा पराभव करण्याऐवजी डाव्यांचा पराभव करण्यासाठी केरळमध्ये का आलात, असा सवाल त्यांनी केला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Its unfortunate that Rahul Gandhi is contesting from Kerala against Left says Sitaram Yechury