पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी परत निवडून आले तर राहुल गांधी जबाबदार - केजरीवाल

आम आदमी पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध

जर देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा परत निवडून आले तर त्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच जबाबदार असतील, असे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर केवळ ट्विटरच्या माध्यमातून कोणती आघाडी असित्त्वात येते, असा प्रश्नही त्यांनी राहुल गांधी यांना विचारला. आम आदमी पक्षाने त्यांचा निवडणूक जाहिरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीला आणि भाजपला सत्तेतून खाली खेचणे हेच आपले महत्त्वाचे उद्दिष्ट्य असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

२०१९ ची लोकसभा निवडणूक देशासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ही निवडणूक म्हणजे देश वाचवा, राज्यघटना वाचवा हाच संदेश देणारी आहे. सर्वात आधी आपण सगळेजण भारतीय आहोत. मग हिंदू किंवा मुस्लिम आहोत, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

आम आदमी पक्षाच्या जाहिरनाम्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा पराभव करण्याचेच सर्वात मोठे आश्वासन देण्यात आले आहे. भाजप देशातील अल्पसंख्यकांच्या विरोधात आहे. आपण सगळे आधी भारतीय आहोत. मग हिंदू किंवा मुस्लिम आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासनही जाहिरनाम्यात देण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही लढा देत राहू, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले..

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 If PM Modi returns Arvind Kejriwal jabs Rahul Gandhi for failed alliance talks