पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विजय पक्का, मताधिक्य मतदार ठरवतील; राजनाथ सिंह यांना विश्वास

राजनाथ सिंह

लखनऊमधील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सकाळी लवकर लखनऊमधील गोमतीनगर मतदान केंद्रामध्ये मतदानाचा अधिकार बजावला. गेल्यावेळच्या निवडणुकीत राजनाथ सिंह या मतदारसंघातून दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. 

लोकसभा निवडणूक पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या ताज्या घडामोडी

मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, लखनऊमधून मी नक्की विजयी होईन. मताधिक्य किती असेल, हे आता जनताच ठरवेल. तो विषय मी मतदारांवरच सोडतो. लोकसभेमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, अशा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की, जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा. 

राजनाथ सिंह यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते. राजनाथ सिंह यांच्याविरोधात यावेळी समाजवादी पक्षाने पूनम सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्या ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसने या मतदारसंघातून प्रमोद कृष्णन यांना उमेदवारी दिली आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदारांसाठी नरेंद्र मोदी यांनी केले नवे आवाहन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 I will win public will decide the margin Rajnath Singh in Lucknow