पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'INS विराट' वैयक्तिक टॅक्सी सारखे वापरले, मोदींचा काँग्रेसला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या प्रचार सभेत पुन्हा एकदा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. नामदान माझ्या संदर्भात अपशब्द वापरण्याची एकही संधी सोडत नाही. लष्कर ही कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, परंतु राहुल गांधी यांचे वडील आणि त्यांच्या कुटुंबियांनी आयएनएस विराटचा वापर हा वैयक्तिक टॅक्सी असल्यासारखा केला, असे रामलीला मैदानातील सभेत मोदींनी म्हटले आहे. 

मोदींनी रामलीला मैदानात केलेल्या भाषणात राजीव गांधींच्या सुरक्षिततेसंदर्भाचा एक दाखला देत काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. राजीव गांधी पंतप्रधान असताना १० दिवसांच्या सुट्टीसाठी आयएनएस विराटमधून एका बेटावर गेले होते. त्यावेळी राजीव गांधी यांच्या सासरची मंडळीही त्यांच्या सोबत होती. या काळात त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्वत आयएनस विराट १० दिवस बेटावर थांबून होते. ही राष्ट्राची सुरक्षा होती का? असा प्रश्न उपस्थित करत  मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

मोदींचे अच्छे दिन संपले, वाईट दिवस सुरू - मायावती

बुलेट प्रुफ सुरक्षिततेसह फिरण्याची मला सवय किंवा छंद नाही, असा उल्लेख त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला केला. जनतेमध्ये फिरणे आनंददायी वाटते. मेट्रोमधून प्रवास करतावेळी लोकांची गर्दी ऊर्जा देऊन जाते. पाच वर्षात सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. परिणामी आजच्या घडीला मोठे नेते आणि अधिकारी यांच्या वाहनावर व्हीआयपीचा दिवा दिसत नाही. प्रत्येक महत्त्वपूर्ण निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला. त्यामुळे हे सर्व तुमचे श्रेय तुमचे आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.