पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये हॉटेलात सापडली EVM, VVPAT यंत्रे, चौकशीचे आदेश

हॉटेलमध्ये सापडली ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रे

ऐन मतदानाच्या दिवशीच बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये हॉटेलात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सापडल्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये दोन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे EVM, नियंत्रण युनिट आणि दोन व्हीव्हीपॅट VVPAT यंत्रे सापडली आहेत. सोमवारीच या मतदारसंघात मतदान झाले. 

व्हीव्हीपॅटवर संशय घेणाऱ्यांना झटका, ५० टक्के चिठ्ठ्यांची पडताळणी होणार नाही

जिल्हाधिकारी आलोक रंजन घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर मतदान केंद्रावरील एखादे यंत्र बंद झाले तर पर्यायी वापरण्यासाठी ही यंत्रे जारी करण्यात आली होती. ती राखीव होती. विभागीय अधिकाऱ्यांना ही यंत्रे देण्यात आली होती. जेणे करून कुठेही यंत्रात बिघाड झाल्याची तक्रार आल्यानंतर ही यंत्रे वापरून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू ठेवता येईल. एएनआय वृत्तसंस्थेला त्यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणी खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये मतदान यंत्रे घेऊन जाणे नियमाच्या विरुद्ध आहे. नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यामुळेच आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आलोक रंजन घोष यांनी सांगितले. 

EVM ठेवलेल्या ठिकाणी जॅमर लावा, काँग्रेसची मागणी

बिहारमध्ये सोमवारी मुझफ्फरपूर, मधुबनी, सारन, हाजीपूर आणि सीतामढी या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. येत्या २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.