पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडून क्लिनचीट

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने अडचणीत सापडलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील सिहोर येथील प्रचारसभेत अमित शाह हत्या प्रकरणातील आरोपी आहेत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. याप्रकरणी भाजपकडून राहुल गांधी यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली होती. आवश्यक पुरावे जमा करुन तपासणी केल्यानंतर गुरुवारी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलेले नाही, असे स्पष्ट करत त्यांना क्लिनचीट दिली.

या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर तोफ डागली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. व्वा! क्या शान है…. असे राहुल गांधी म्हणाले होते. तसेच शहा यांच्या मुलाच्या संपत्तीच्या वाढीवरुनही त्यांनी अमित शाह यांना टोला लगावला होता. जय शाह जादूगर आहे. तीन महिन्यात त्याने ५० हजार रुपयांचे ८० कोटी रुपये केले, असा टोला त्यांनी लगावला होता.

  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 EC gives clean chit to Rahul Gandhi over MP poll speech against Amit Shah