पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपसाठी EVM म्हणजे 'इलेक्ट्रॉनिक व्हिक्ट्री मशीन': काँग्रेस

अभिषेक मनु सिंघवी

काही निवडक मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. भाजपासाठी इव्हीएम म्हणजे 'इलेक्ट्रॉनिक व्हिक्ट्री मशीन' असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

पक्ष प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने आमच्या दोन मागण्या फेटाळल्याची माहिती आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजली. आमची पहिली मागणी ही मतमोजणीपूर्वी मतपत्रिकेची पडताळणी व्हावी ही होती. ही मागणी फेटाळण्याचे काय कारण असू शकते ? याचा काय आधार आहे ?

EVMला विरोध करणाऱ्या पक्षांना अमित शहांचे ६ प्रश्नं

आता निवडणूक आचारसंहिता ही निवडणूक प्रचारसंहिता झाली आहे. आता असे वाटते की, इव्हीएम भाजपसाठी 'इलेक्ट्रॉनिक व्हिक्ट्री मशीन' बनली आहे.

घटनेसाठी हा काळा दिवस आहे. जर एकाचीच बाजू घ्यायची असेल तर संस्थेच्या स्वातंत्र्याचा अर्थच काय राहिल, असा सवालही त्यांनी केला.

EVM: भाजपच्या माजी नेत्याचे सुप्रीम कोर्टबाबत वादग्रस्त वक्तव्य