पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदींपेक्षा अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान करायचं होतं'

प्रियांका गांधी (PTI)

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचारात चांगलीच रंगत आल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या प्रचारसभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. मिर्झापूर येथील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. नागरिकांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या की, 'तुम्ही जगातील सर्वांत मोठ्या अभिनेत्याला पंतप्रधान केलं आहे. यापेक्षा तुम्ही अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान करायचं होतं,' असा टोला त्यांनी लगावला.

आता सक्रिय राजकारणात आले नसते तर भेकडपणा ठरला असता - प्रियांका गांधी

मिर्झापूर येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, 'आता तुम्हाला समजलं असेलच की तुम्ही जगातील सर्वांत मोठ्या अभिनेत्याला आपला पंतप्रधान केलं आहे. यापेक्षा तर तुम्ही अमिताभ बच्चन यांनाच पंतप्रधान करायचं होतं. काम तर कुणालाच करायचं नाही.'

लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : प्रियांका गांधी

या मतदारसंघातून काँग्रेसकडून ललितेशपती त्रिपाठी हे निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांच्याविरोधात अपना दलच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या उभ्या आहेत. 

मोदींना वाटते ढगाळ हवामानामुळे ते लोकांच्या रडारवर येणार नाहीत, प्रियांकांचा टोला

या मतदारसंघातून काँग्रेसने ५ वेळा, समाजवादी पार्टीने ४ वेळा भाजपने २, बसपाने २ वेळा विजय मिळवला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha elections 2019 Amitabh Bachchan would have been better choice Priyanka Gandhi jabs Modi