पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस आणि भाजप एकसारखेच, अखिलेश यांची सडकून टीका

अखिलेश यादव

एकीकडे भाजपचे आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या दोन्ही पक्षांमध्ये काहीही फरक नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस पक्ष भाजपला फायदा होण्यासाठी काम करतो आहे, असा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे तीन टप्पे शिल्लक असताना अखिलेश यादव यांनी केलेल्या आरोपांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोदींवर ७२ वर्षांची भाषण बंदी घाला, अखिलेश यांची मागणी

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील सध्याच्या स्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल एकत्र आल्यामुळे भाजप अडचणीत आला आहे. त्याची घोडदौड मंदावली आहे. ज्या संस्थांच्या माध्यमातून विरोधकांची गळचेपी करता येते. त्यांच्याबद्दल भाजपने काँग्रेसकडून काहीतरी शिकले असावे, अशी स्थिती आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.

भाजपची मते खाण्यासाठी काँग्रेसकडून कमकुवत उमेदवार दिले असल्याच्या मुद्द्यावरही अखिलेश यादव यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, काँग्रेसने उत्तर प्रदेशात कुठेही कमकुवत उमेदवार दिले आहेत, असे मला तरी वाटत नाही. कोणताही पक्ष असे करणार नाही. पण लोक त्यांच्यासोबत नाहीत. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीही फरक नाही. जशी काँग्रेस आहे, तसाच भाजप पण आहे. दोघांमध्ये काहीही अंतर नाही.

माझ्यावरील लोकांचे प्रेम बघितल्यावर सपा, बसपाचा BP वाढतो - मोदी

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यंदा इतिहास घडवून दाखवेल आणि देशाला नवा पंतप्रधान मिळेल, असे सांगून अखिलेश यादव म्हणाले, मोठमोठ्या पक्षांचे मोठ मोठे नेते उत्तर प्रदेशात येऊन मोठ मोठ्या गप्पा मारून गेले. पण त्यांच्या भाषणामध्ये काहीही दम नव्हता. घोषणा देणाऱ्यांमध्येही काहीही दम उरलेला नाही. महाआघाडीसाठी लोक मतांचा पाऊस पाडत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.