पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधी पक्ष नेत्यांच्या शुभेच्छांना नरेंद्र मोदी यांनी असे दिले उत्तर...

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत भाजपला आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान उभे केले होते. पण नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा चमकदार यश मिळवित विरोधी पक्षांचा धुव्वा उडवला. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला यंदाही लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसारखीच झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. देशातील जनता मालक असते. आणि त्यांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच इतरही नेत्यांनी ट्विटर आणि इतर माध्यमातून नरेंद्र मोदी यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उत्तर दिले आहे. त्यांनी अभिनंदन करणाऱ्या राजकीय नेत्यांचे आभार मानले आहेत. 

राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद असे लिहिले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना उत्तर देताना लिहिले आहे की, पंजाबमध्ये तुमच्या पक्षाने केलेल्या कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन. पंजाबच्या कल्याणासाठी आपण एकत्र मिळून काम करू.

तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टॅलिन आणि आंध्र प्रदेशमधील तेलगू देशम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्याही शुभेच्छा संदेशांना नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election results 2019 pm narendra modi thanks rahul gandhi and other opposition leaders after historic mandate