पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: घाबरु नका, आत्मविश्वास ठेवा, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

राहुल गांधी (ANI)

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास कायम राखण्याचा सल्ला दिला आहे. घाबरु नका, आत्मविश्वास ढासळू देऊ नका, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. देशात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पत्रकार परिषदेला सामोरे गेलेल्या राहुल गांधी यांनी भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छाही दिल्या. जनता मालक आहे. मोदींचे अभिनंदन असे ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी अमेठीतून विजय मिळवल्याबद्दल स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले, आमची विचारधारेची लढाई आहे. दोन वेगवेगळे विचार आहेत. लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरपूर कष्ट केले आहे.  निकालांमुळे घाबरु नका. आत्मविश्वास ढासळू देऊ नका. 

lok sabha election result 2019: हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

अमेठीतील विजयानिमित्त स्मृती इराणी यांचे अभिनंदन. आता त्यांनी अमेठीतील जनतेसाठी प्रेमाने काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रचार अभियान दीर्घकाळ होते. मी यावेळी माझ्याबाबत कोणीही, काहीही बोलले तरी त्याला प्रेमाने उत्तर देण्याचे मी ठरवले होते. त्याप्रमाणेच मी या निवडणुकीत प्रचार केला. प्रेम पराभूत होत नसते, असेही ते म्हणाले.