पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Lok Sabha Election Result 2019 : भाजपच्या विजयाने मध्यमवर्गाच्या इमानदारीला नवी ताकद - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी आणि अमित शहा

सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मिळवलेले यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेच्या चरणी अर्पण केला. हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा विजय आहे. त्यासाठी मी देशातील कोट्यवधी लोकांना नमन करतो, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात सुरुवातीला पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षांत पक्षाने देशात केलेल्या कामगिरीचा आढावा आपल्या भाषणामध्ये घेतला. यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

आता घराणेशाही-जातीयवादी पक्षाला थारा नाही : अमित शहा

मोदी म्हणाले, २०१९ चा जनादेश नव्या भारतासाठी आहे. देशातील कोटी कोटी नागरिकांना मी त्यासाठी नमन करतो. फकिराच्या झोळीत त्यांनी भरभरून दान टाकले. देशातील नागरिकांनी भारतासाठी मतदान केले. भारतातील मतदानाचा आकडा ही लोकतांत्रिक विश्वातील सर्वात मोठी घटना आहे. जगाला याची दखल घ्यावी लागेल. या विजयाने देशातील मध्यमवर्गाच्या इमानदारीला नवी ताकद मिळाली, असे त्यांनी सांगितले.

हा हिंदूस्थानचा, जनतेचा विजय आहे. सर्व विजयी झालेल्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे सांगून नरेंद्र मोदी म्हणाले, आतापर्यंतच्या जवळपास सर्वच निवडणुका भ्रष्टाचार आणि धर्मनिरपेक्षता या दोन मुद्द्यांवर लढल्या गेल्या. पण आता झालेली निवडणूक ही एकमेव होती ज्यामध्ये भ्रष्टाचाराचा आणि धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा उपस्थित केला गेला नाही. भाजप राज्यघटनेला समर्पित आहे. भाजप परिवारातील प्रत्येकाने निस्वार्थपणे लोकशाही झेंडा उंच ठेवण्यासाठी आपली भूमिका निभावली आहे, असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

दोनपासून दुसऱ्यांदा निवडून येण्यापर्यंत भाजपमध्ये अनेक गोष्टी घडल्या. पण आम्ही आमचे आदर्श, आमचे संस्कार सोडले नाहीत. यापुढेही सोडणार नाही. माझे सर्वस्व देशाला अर्पण आहे. मी दुष्ट हेतून कोणतेही काम करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशवासियांना यावेळी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जे काही घडले ते आता मागे पडले आहे. यापुढे मला सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.