पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: मतविभागणीचा शिंदेंना फटका, सलग दुसऱ्यांदा पराभव

सुशीलकुमार शिंदे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सलग दुसऱ्यांदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. गुरुवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिंदे यांचा १.५५ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. भाजपचे उमेदवार आणि लिंगायत गुरु डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी त्यांचा पराभव केला. 

शिंदे यांना ३,६२,३२९ मते मिळाली तर विजयी उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज यांना ५,१६,८९२ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही १,६८,०७६ मते मिळवली. त्यांनी दलित आणि मुस्लिम समाजाची मते मिळवली. जी काँग्रेसची पारंपारिक मते होती. 

२०१४ च्या निवडणुकीत मध्ये झालेल्या पराभवापासून धडा घेत शिंदे यांनी यंदा आव्हान स्वीकारले होते. प्रचारावेळी शिंदे यांनी प्रत्येक मतदाराला व्यक्तिशः भेटण्याचा प्रयत्न केला. 

lok sabha election result 2019: मोदी लाटेतही राखलेला गड यंदा ढासळला, अशोक चव्हाण पराभूत

जंगम असलेले जयसिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी देऊन भाजपने शिंदेंसमोर आव्हान उभे केले होते. ६३ वर्षीय धर्मगुरु जयसिद्धेश्वर महाराज यांचे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव आणि केळशी येथे मठ आहेत. तिथे मोठ्यासंख्येने लिंगायत समाजातील लोक दर्शनासाठी येतात.

जिल्ह्यातील भाजपचे दोन मातब्बर नेते पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपली पूर्ण ताकद जयसिद्धेश्वर महाराज यांच्यासाठी वापरली. या दोन देशमुखांनी महाराजांना मराठा आणि लिंगायत मते मिळण्यासाठी मोठे प्रयत्न केले. 

प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर ही लढत विकासात्मक मुद्द्यांऐवजी जातीच्या आधारावर लढली गेली. स्थानिक पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनीही सोलापूर लोकसभा निवडणूक ही वास्तवातील मुद्द्यांऐवजी जातीवर आधारित लढली गेल्याचे सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election result 2019 In Solapur Shinde loses for a second time Ambedkar too bites the dust