पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

lok sabha election result 2019: NDA, UPA सह अन्य पक्षांचा ताळेबंद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा

सतराव्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने लाटेनंतरची सुनामी काय असते याची झलक  दाखवत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. एक्झिट पोलचा अंदाजापेक्षा जोरदार कामगिरी करत भाजपने चक्क तीनशेचा पल्ला पार करुन भारताच्या निवडणूक इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची बोलती बंद केली. 

Lok Sabha Election Result 2019 : महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला  (२८२) जागा मिळाल्या होत्या. या आकड्यात त्यांनी आणखी भर घातली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने ( २८२ + २१ आघाडीवर २१= ३०३ पर्यंत मजल मारली. दुसरीकडे काँग्रेसला मागील निवडणुकीच्या (४४) तुलनेत जागा वाढवण्यात अपयश आले. त्यांना (४२ +आघाडीवर ८= ५२)   जागा मिळाल्या आहेत.  

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए-३५३)
भारतीय जनता पक्ष - ३०३
शिवसेना- १८
राष्ट्रीय जनता दल- (जेडीयू)  १६
लोक जनशक्ती पक्ष- (एलजेपी) ६
शिरोमणी अकाली दल- (एसएडी)२ 
 अपना दल- (एडी-एस)२
नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)-१
राष्ट्रीय लोक समता पक्ष (आरएलटीपी)-१
अण्णा द्रमुक (एआयडीएमके) -१
नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-१ 
 मिझो नॅशनल फ्रन्ट-१
ऑल झारखंड स्टुडंट युनियन पार्टी- १
 
-----------------------------------------------------------
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए- ९२)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- ५२
डीएमके- २३
राष्ट्रवादी काँग्रेस- ५
इंडियन युनियन मुस्लीम लीग-३  
जम्मू अँण्ड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स- ३
झारखंड मुक्ती मोर्चा- १
केरळ काँग्रेस (माक्सवादी)- १
व्ही.एस.के.- १
रिव्हल्युशनरी सोशिअलिस्ट पार्टी- १
जनता दल(सेक्युलर)-१
रिव्हल्युशनरी सोशिअलिस्ट पार्टी- १
अपक्ष- १
 -----------------------------------------------------------

इतर (९७)
(वायएससीआरपी) काँग्रेस पक्ष- २४
तृणमूल काँग्रेस - २२
बिजू जनता दल- १२
बहुजन समाज पक्ष- १०
तेलंगणा राष्ट्रीय समिती-९
समाजवादी पार्टी-५
तेलुगू देसम पक्ष- ३
सीपीएम- ३
अपक्ष-३
सीपीआय-२
एआयएमआयएम-२
आप-१
नागा पिपल्स फ्रन्ट-१
 सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा- १
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रन्ट- १