पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा गोडसेंच्या विचारांचा विजय, पराभवानंतर दिग्गीराजांची प्रतिक्रिया

दिग्विजय सिंह (ANI)

लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली आहे. परंतु, गुरुवारी लागलेल्या निकालात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचाही समावेश आहे. भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. निकालानंतर माध्यमांसमोर आल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी अपेक्षेपेक्षा निकाल वेगळा लागल्याची प्रतिक्रिया दिली. 

ते म्हणाले, आज या देशात महात्मा गांधींचे मारेकरी गोडसेच्या विचारधारेचा विजय झाला आहे. गांधींची विचारधारा हारली आहे. मला माझ्या पराभवापेक्षा याचीच चिंता सतावत आहे. 

प्रायश्चित घेण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे मौनव्रत

भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयावर त्यांनी हैराण होत म्हटले, ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे की, प्रत्येकवेळी मतदानापूर्वीच भाजपला निकालाची माहिती कशी मिळते ? 

'एक आश्चर्यजनक गोष्ट आहे की, २०१४ मध्ये जेव्हा निवडणूक झाली. तेव्हा भाजपची २८० पार ही घोषणा होती. यावेळी त्यांची घोषणा ही ३०० पार होती आणि तसे झालेही. मला समजत नाही की त्यांच्याकडे अशी कोणती जादूची छडी आहे, जी निकालापूर्वीच अचूक भविष्यवाणी करते. खरंच त्यांचे यासाठी अभिनंदन,' असा टोलाही लगावला. 

इतके का घाबरलाय?, नरेंद्र मोदींचा दिग्विजय सिंह यांना प्रश्न

निवडणूक प्रचारात काही चूक झाली का, असा प्रश्न त्यांनी विचारला असता ते म्हणाले की, कोणतीच चूक झाली नाही. मतदानापूर्वी सर्वांनाच माझ्या विजयाची खात्री होती. मला अनेक भाजप नेत्यांचे शुभेच्छांचे संदेशही आले. पण जो निकाल लागला तो तुमच्यासमोर आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election result 2019 digvijaya singh reaction after losing bhopal loksabha seat to bjps pragya singh thakur