पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Lok Sabha Election Result 2019 आता घराणेशाही-जातीयवादी पक्षाला थारा नाही : अमित शहा

भाजप अध्यक्ष अमित शहा

लोकसभा निवडणुकीतील विक्रमी विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. आता घराणेशाही जातीयवादी पक्षाला जनता थारा देणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 'सबका साथ सबका विकास' या भावनेने शासन करणाऱ्या मोदींना हटाव हा नारा लगावणाऱ्या विरोधकांना जनतेने धडा शिकवला, असेही शहा यावेळी म्हणाले. 

एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतरही विरोधकांमध्ये सत्तेत परतण्याची धडपड सुरु होती. मात्र जनतेने त्यांना कौल दिला नाही. एक्झिट पोलपेक्षा अधिक मताधिक्याने जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला पसंती दिली. याबद्द्ल मी तुमचे आभार मानतो, असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले. मोदींच्या नेतृत्वाखाली आगामी काळात राष्ट्राला महाशक्तीच्या दिशेने घेऊन जाऊ असेही शहा यावेळी म्हणाले. 

Lok Sabha Election Result : भाजप पुन्हा स्वबळावर सत्तेत, देशात 'फिर एक बार मोदी सरकार'

आपल्या भाषणात त्यांनी दिल्लीतील फेऱ्या मारणाऱ्यांना जनतेने नाकारल्याचे सांगत  गांधी घराणेशाहीवर टीका केली. याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे नेते चंद्राबाबू यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. दिल्लीच्या फेऱ्या मारण्यापेक्षा मतदारांच्या भेटी घेतल्या असत्या तर तुम्हाला खाते उघडता आले असते, असा टोला त्यांनी चंद्राबाबूंना लगावला. 

शहा यांनी भाजप आणि घटक पक्षाला मिळालेल्या विजयाला स्वतंत्र भारतातील पहिला ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत 'सबका साथ सबका विकास' असे काम केले. त्याचा हा विजय आहे. हा देशातील जनतेचा आणि ११ कोटी भाजप कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे शहा म्हणाले.  

ते पुढे म्हणाल की, "गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने ५० कोटी गरीब कुटुंबियांसाचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले. ७० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या सरकारने हे काम करुन दाखवले. त्यांच्या आशिर्वादाने हा विजय शक्य झाला. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा एकत्र आल्यानंतर प्रसारमाध्यमांना उत्तर प्रदेशमध्ये काय होईल याची चिंता सतावत होती. पण याठिकाणी मिळालेला यश सागते की पुढील काळात घराणेशाहीला सत्ता मिळणार नाही."   

Lok Sabha Election Result 2019 : महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी