पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या केजरीवालांसोबत घडलेल्या धक्कादायक घटना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. प्रचार रॅलीदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्या श्रीमुखात लगावण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांच्यासोबत आशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

४ एप्रिल २०१४ मध्ये प्रचारादरम्यान केजरीवाल यांना एका रिक्षा चालकाने  श्रीमुखात लगावली होती. याप्रकरणानंतर केजरीवालांनी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला पुष्पगुच्छ देत त्याला माफ केले होते. 

 प्रचारावेळी अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली

# २०१४ मध्ये वाराणसी येथील लोकसभेच्या प्रचार सभेत काही लोकांनी केजरीवाल यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला होता.    
# २०१४ मध्ये दिल्लीच्या सुल्तानपुरी परिसरातील प्रचारावेळी एका रिक्षा चालकाने केजरीवालांच्या कानशिलात लगावली होती.  
# हरियाणातील भिवानी येथील सभेत एका व्यक्तीने केजरीवालांवर हल्ला केला होता. संबंधित व्यक्तीने आपण समाजसेवक अण्णा हजारे यांचा समर्थक असल्याचे म्हटले होते.  
# २०१८ - दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर सम-विषम योजनेसंदर्भात जनतेला संबोधित करत असताना एका तरुणीने केजरीवाल यांच्यावर  शाई फेकली होती. या तरुणीने त्यांच्यावर सीएनजी घोट्याळाचा आरोप केला होता. 
#२०१८ च्या नोव्हेबरमध्ये  एका व्यक्तीने दिल्ली सचिवालयामध्ये केजरीवालांचा चष्मा काढून त्यांच्या डोळ्यात लाल मिर्ची पावडर टाकल्याचा प्रकार घडला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election kejriwal slapped again in delhi know when he attacked since 2014 to 2019